अनिकेत कोथळे हत्याप्रकरण, सांगलीत बंदला मोठा प्रतिसाद

सांगलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलीये. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीनं अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध म्हणून सांगलीत मोटर सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं. 

Updated: Nov 13, 2017, 04:29 PM IST
अनिकेत कोथळे हत्याप्रकरण, सांगलीत बंदला मोठा प्रतिसाद title=

सांगली : सांगलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलीये. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीनं अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध म्हणून सांगलीत मोटर सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं. 

अनिकेतच्या हत्येप्रकरणी आरोपींना पाठिशी घालणारे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उप-अधीक्षकांवरही कावाईची मागणी सांगलीकरांनी केलीय. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार याप्रकरणी काही राजकीय नेते आणि वरिष्ठ अडचणीत येण्याची शक्यता आहे. य़ाप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. तर राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज असल्यानं गृहमंत्रिपदाचा कार्यभार दुस-य़ाकडे सोपवण्याची मागणी मनसेनं केलीय.