विदर्भात या ठिकाणी सापडला जगातील पहिला मुंगी कोळी !

 रंगूबेली परिसरात मुंगी कोळी अर्थात अँट स्पायडर दिसून आला आहे.

Updated: May 11, 2021, 10:09 AM IST
विदर्भात या ठिकाणी सापडला जगातील पहिला मुंगी कोळी ! title=

 अनिरुद्ध दवाळेसह अमर काणे / नागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे माणसे घरात कोंडली गेली असली तरी, जंगलातील जीवन मात्र अनिर्बंध आणि अव्याहत सुरु आहे. मेळघाटच्या जंगलात, निसर्गाच्या कुशीत संशोधकांनी मुंगीसारखा दिसणारा आणि निशाचर असलेल्या एका कोळ्याचा शोध लावला आहे. मेळघाट येथील रंगूबेली परिसरात मुंगी कोळी अर्थात अँट स्पायडर दिसून आलाय.  नर  अँट स्पायडरची (Ant spiders) जगातील ही पहिली नोंद असल्याचं तज्ज्ञ सांगतात. (Ant spiders have been spotted in the Rangubeli area of ​​Melghat) 

जाळे विणून त्यात सावज गाठणाऱ्या कोळी  कीटकाचा आपल्या घरापासून ते जंगलांपर्यंत सर्वत्र संचार असतो. त्याच्या जाळ्याचे अप्रुप सर्वांनाच आहे. अगदी त्यापासून स्पायडरमॅन के काल्पनिक पात्र देखील साकारले गेले आहे. विदर्भातील मेळघाटच्या जंगलात घातक शिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोळ्याची मुंगीसारखी दिसणारी आणि रात्री विचरण करणारी प्रजाती संशोधकांनी शोधून काढली आहे. मेळघाट येथील रंगूबेली तापी परिसरात धारखोर परिसरात हा  मुंगी कोळी अर्थात अँट स्पायडर आढळून आला आहे. याबाबत अमरावतीमधील दर्यापूर  स्पायडर रिसर्च प्रयोगशाळेचे डॉ.अतुल बोडखे यांनी माहिती दिली.

सातपुडामधील जैवविविधेत आढळून आलेला हा कोळी मुंग्या झाडांना हानी पोहचवणाऱ्या किड्यांना मारतो. मेळघाटच्या जंगलात कोळ्यांच्या 204 प्रजाती असून त्यात या मुंगीसारख्या दिसणाऱ्या नव्या  पाहुण्याची भर पडलीय. संशोधक अतुल बोडखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा नवीन स्पायडर शोधून काढला आहे. झाडांच्या पानापाटोळ्याखील तो आढळू येतो. मुंगीसारखा दिसणाऱ्या नर कोळ्याची लांबी 3.4 मि.मी. असून मादीची लांबी 4.2 मि.मी. असते. 

डॉ. अतुल बोडखे आणि त्यांचे सहकारी केंद्र दर्यापूरच्या जे डी पाटील सांगळुदर महाविद्यालयातील स्पायडर रिचर्चा प्रयोगशाळेत या नवीन प्रजातीचा अभ्यास करीत आहेत आतापर्यंत या प्रयोगळेथ कोळ्यांच्या 17 नवीन प्रजातींचा शोधलं आहे. एन्ट स्पायडर म्हणून ओळखला जाणाऱ्या या नवीन प्रजातीबद्दल संशोधन सुरू असून येत्या काळात काही नवीन माहिती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.