रायगडमध्ये पर्यटकांची अँटीजन टेस्ट, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची लोणावळ्यातून हकालपट्टी

 पावसामुळे अनेक ठिकाणी धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

Updated: Jun 13, 2021, 04:12 PM IST
रायगडमध्ये पर्यटकांची अँटीजन टेस्ट, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची लोणावळ्यातून हकालपट्टी title=

रायगड : वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना अडवून त्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर पोलीस आणि आरोग्य विभागाची ही कारवाई सुरु आहे.

लोणावळा, खंडाळ्याकडे निघालेल्या पर्यटकांचा यामुळे मोठा हिरमोड झाला आहे. अलिबागमध्येही पर्यटकांकडून दंडवसुली केली जात आहे. चौल नाका इथं रेवदंडा पोलिसांची कारवाई सुरु आहे.

शासकीय नियमांचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांची हकालपट्टी करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कोरोनामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांना येण्यास मनाई आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात लोकं गर्दी करत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी धबधब्यांवर देखील पर्यटकांची गर्दी वाढत आहे.