Appointment of 12 MLAs: विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात अर्जदारानं याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे प्रकरण निकाली लागले आहेत. आता राज्यपालांना आमदार नियुक्त करायचे असेल तर करू शकतात, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती लवकर केली जाण्याची शक्यता आहे.कारण यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात आली आहे.
बरेच महिने हा वाद रखडला होता. महाविकास आघाडीच्या काळात तात्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वारंवार आमदारांची यादी दिली जायची. पण त्यावर निर्णय घेतला जात नव्हता. पण आता भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्जदाराने याचिका मागे घेतल्याने राज्यपालांवर कोणते बंधन नाही,असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राज्यपालांकडे कोणत्याही क्षणी 12 आमदारांच्या नियुक्तीची यादी सोपवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
हे आमदार आता कोणते असतील, त्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मंत्रीपदासंदर्भात अस्वस्थता होती. पण आता शिवसेनेसह भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांचीही विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त आमदारपदी निवड होऊ शकते. आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जाणार आहे.
राज्यपाल कशाप्रकारे आमदारांची नियुक्ती करतात, ते बघूया..त्यानंतर यावर बोलता येईल,अशी प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी दिली.