पुणे : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे मोठी कमान आणि मोबाईल टॉवर कोसळला आहे. मोबाईल टॉवर कोसळल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर कुणीच नव्हतं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मंगळवार पेठेतील आनंदी नगरमधील रघुकुंज जवळचा टॉवर कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शिवाजीनगरमध्ये कमानही कोसळली मात्र रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळला. कमान रस्त्यात आडवी पडल्यामुळे रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे. पुण्यात वादळीवाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
एवढंच नव्हे तर वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मलून पडली आहेत. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे रस्ते मोकळे आहेत. त्यामुळे निर्मनुष्य रस्त्यांवर कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळला आहे. पण पावसाने पुण्यात कहर केला आहे.