कदम आजोबांची भ्रमंती फक्त घोड्यावरच

सोलापूरमधल्या एका वयोवृद्धाचा अनोखा छंद सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतोय...करमाळा तालुक्यातल्या झरे गावचे अर्जून कदमांनी आजपर्यंत वाहनानं प्रवासचं केलेला नाही...

Updated: Jul 28, 2017, 04:11 PM IST
कदम आजोबांची भ्रमंती फक्त घोड्यावरच title=

संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : सोलापूरमधल्या एका वयोवृद्धाचा अनोखा छंद सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतोय...करमाळा तालुक्यातल्या झरे गावचे अर्जून कदमांनी आजपर्यंत वाहनानं प्रवासचं केलेला नाही...

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या झरे गावातल्या अर्जून कदमांनी वयाची नव्वदी गाठलीय....पण आजपर्यंत त्यांनी प्रवासासाठी कुठलही वाहन वापरलेलं नाही...तुम्ही म्हणाल कदम आजोबांनी प्रवासच केलेला नाही का? तर तसं नाहीये...वयाच्या सहाव्या वर्षापासून अर्जुन कदम फक्त घोड्यावरच प्रवास करतात..

कदम आजोबांनी आजपर्यंत पाच घोडे बदललेत. आठवडी बाजारापासून तर लग्नाकार्यापर्यंत सगळीकडे जाण्या-येण्यासाठी ते घोड्यावरच प्रवास करतात...

एकीकडे रस्ते अपघातात देशातला दुसरा क्रमांक आणि दुसरीकडे आयुष्यभर घोड्यावरून प्रवास करणारे नव्वदीतले अर्जुन कदम...महाराष्ट्रातलीच ही दोन चित्रं सगळ्यांच विचार करायला भाग पाडणारी आहेत.