सोलापूरात ३ हजार यंत्रमागांची धडधड बंद

सोलापूरचे वैभव असलेल्या ३ हजार यंत्रमागाची धडधड यंत्रमागधारकांनी बंद ठेवली आहे

Updated: Oct 9, 2017, 09:32 PM IST
सोलापूरात ३ हजार यंत्रमागांची धडधड बंद title=

संजय पवार झी मीडिया सोलापूर :  सोलापूरचे वैभव असलेल्या ३ हजार यंत्रमागाची धडधड यंत्रमागधारकांनी बंद ठेवलीय. कामगारांना भविष्य निर्वाह निधी जमा करण्यावरून सध्याच्या ईपीएफ आयुक्तांनी घेतलेलं धोरण जाचक असल्याचं सांगून यंत्रमाग धारकांनी बेमुदत बंद आंदोलन सूरू केलंय. या बंदमुळे हातावर पोट असलेल्या हजारो कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झालाय.

सोलापूर शहरात तीन हजार यंत्रमागावर पन्नास हजार कामगार काम करत आहेत. आतापर्यंत अनेक लूम्स हे एकाच छताखाली अनेक युनिटच्या नावाखाली काम चालत होते, या एकाच छताखाली अनेक युनिट असल्याने कामगार कायद्याच्या कचाट्यातून या यंत्रमाग धारकांची सुटका होत होती.

मात्र, नवीन आलेल्या कायद्यानुसार कामगार भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी एकाच छताखाली काम करत असलेल्या कामगारांच्या संख्येवरून या अनेक युनिटचे क्लबिग करून यंत्रमाग धारकांना कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे हे बंधनकारक केलयं. तेही गेल्या पंधरा वर्षांपासूनचा पीएफ भरण्याचे आदेश देतील या भीतीने यंत्रमागधारकांनी या कायद्याच्या विरोधात बेमुदत संप सुरु केलाय. भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी अश्या पद्धतीचा कायद्याची नोटीस म्याकल नावाच्या यंत्रमागधारकाला दिल्याने यंत्रमाग धारकांनी हे अंदोलन सुरु केलाय.

यंत्रमाग धारकांनी संप करून कामगारांना वेठीस धरू नये यासाठी कामगार भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांनी यंत्रमाग धारक संघटना यंत्रंन्ग धारकात गैरसमज निर्मण करीत असल्याचे आयुक्तांनी म्हणणं आहे. कायद्यानुसार ही कारवाई असल्याचे त्यांनी सांगितलंय, यंत्रमागधारकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत यंत्रमाग धारकांनी या कायद्याच्या विरोधात न्यायालयात आढावा राज्य सरकारकडे जाण्याचा सल्ला दिलाय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर योग्य निकाल व्हावा हीच मागणी सध्या यंत्रमागधारक करीत आहेत.