वसईतील एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

वसईत एका घरात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Updated: Feb 4, 2024, 11:20 PM IST
वसईतील एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ title=

Vasai Crime News : एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने वसईत खळबळ उडाली आहे. हे तीनही मृतदेस संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत.  घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. 

वसई पश्चिमेच्या उमेळमान येथील आशा सदन सोसायटीत राहणाऱ्या तीन जणांचा रहस्यमय मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत तिघेजण हे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात राहणारे असून, ते वसई परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील नागरिकांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बंद घराचा दरवाजा तोडला असता त्यांना तीन जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

मोहम्मद अझहम, राजू आणि चुटकाउ बाबू अशी या मयत इसमांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याचे गूढ अजून समजू शकलेले नाही पोलिसांनी केलेल्या तपासणीत सर्व मृतदेह दोन दिवसांपूर्वी मयत झाल्याचे समजत आहे. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात पूर्ववैमस्यातून धारदार शस्त्राने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. रिझवान शेख उर्फ सोनू व जंटेकम शेख अशी या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपिंनी पूर्ववयमस्यातून त्यांच्या ओळखीचा सलीम शेख याला प्रगतीनगर परिसरात कोयत्याने व सुऱ्याने हल्ला केला, यावेळी आरोपिंचा सलीम शेख याला संपविण्याचा डाव होता, मात्र सलीम या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याचा जीव वाचला आहे, तुळींज पोलिसांना याबाबतचीं तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना सापळा रचून अटक केली आहे.

ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा मृत्यू झालाय. गोंडपीपरी तालुक्यातून जाणाऱ्या अहेरी-चंद्रपूर मार्गावरील आक्सापूरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मृतक तिघेही गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यात असलेल्या कालीनगर येथील रहिवासी आहेत. अमृत सरकार (32), शैलेंद्र रॉय (63) आणि मनोज सरदार (43) अशी मृतांची नावं आहेत. दुपारी हे तिघेही २ दुचाकीने चंद्रपूरकडे निघाले होते. आक्सापूर येथील मंदिराजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. खनिज घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करत धावणाऱ्या वाहनांविरोधात सामान्य नागरिकात मोठा संताप व्यक्त केला जात आहे.