उमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांचीही मुलाखत घेतली होती का? भर कार्यक्रमात काँग्रेसच्या निरीक्षकाने सगळच सांगितलं...

Latur Congress:  लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2024, 08:06 PM IST
उमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांचीही मुलाखत घेतली होती का? भर कार्यक्रमात काँग्रेसच्या निरीक्षकाने सगळच सांगितलं... title=
अमित देशमुख

Latur Congress: जम्मू काश्मिर आणि हरियाणा विधानसभेचा निकाल समोर आलाय. आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना, जनतेला राज्यातल्या विधानसभेबद्दल उत्सुकता लागली आहे. येत्या आठवड्यात कधीही निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. उमेदवारांचे इनकमिंग-आऊटगोइंग सुरु आहे. काही ठिकाणी आमदारकी देण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. यावेळी मुलाखती घेणाऱ्या मुलाखतकारानेच कॉमेडी करुन उपस्थितांना हसवले. काय होता हा मजेशीर प्रसंग? जाणून घेऊया. 

लातूर जिल्ह्यतल्या कॉंग्रेसच्या इछुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक रामहरी रूपनवार हे आज लातुरात आले होते. कॉंग्रेस भवनात ठारल्यावेळेप्रमाणे येऊन त्यांनी 6 मतदार संघातील एकूण 30 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांची मुलाखत न घेताच त्यांनी दोघांच्या मुलाखती झाल्याचं जाहीर केलं. इथून बाहेर पडल्यावर अमित देशमुखच आमचे नेते असल्यामुळे येथे आगाऊपणा करणार नाही असे ते म्हणाले. त्यांनी असे म्हणताच एकच हशा पिकला. 

दहशतवाद्यांकडून वडीलांची हत्या; आता लेक आमदार बनून जाणार विधानसभेत; कोण आहे शगून परिहार?

काय म्हणाले मुलाखतकार?

धीरज देशमुख यांच्या मुलाखती मी रोजच टीव्हीवर एकतो. अमित भैयानी आत्ता जे भाषण केलं तीच त्यांची मुलाखत समजूया. त्यामुळे त्यांची मुलाखत झाल्याचं मी जाहीर करतोय. इथूनन उठल्यावर मी निरीक्षक नाही त्यामुळे जास्ती अगाऊपणा करून चालणार नसल्याचेदेखील रूपनवार यावेळी म्हणाले. हे सांगत असताना उपस्थितांना हसू अनावर झाले होते.

मोदी-शहा नव्हे,'या' चाणाक्याने भाजपला हरियाणात जिंकवलं! अवघ्या 20 दिवसात पलटवली बाजी