'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्या'वरुन ठाकरे विरुद्ध पवार? विधानसभेआधीच मविआमध्ये चलबिचल?

Chief Minister Post:विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलाय.

Pravin Dabholkar | Updated: Sep 4, 2024, 07:36 PM IST
'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्या'वरुन ठाकरे विरुद्ध पवार? विधानसभेआधीच मविआमध्ये चलबिचल? title=
'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्या'वरुन ठाकरे विरुद्ध पवार?

Chief Minister Post: 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे' अशी जाहीर घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या मेळाव्यात केली होती.तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. त्याला माझा पाठिंबा असेल असं विधान केलं होतं.एकीकडे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असं ठाकरे गट म्हणतोय. तर दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गट मात्र या मुद्द्यावर उदासीन दिसतायत.. शरद पवारांनीही ठाकरेंची मागणी अमान्य करत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकलाय.. 

काय म्हणाले पवार?

निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं. निवडणुकीत मतं मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. आम्ही नक्की एकत्र बसू.. एका विचाराने लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय, सरकार या राज्याला देऊ, असं त्यांनी म्हटलंय. 

नाना पटोले मुख्यमंत्री?

दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणाबाजी करताना दिसतायत.महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, नाना पटोले जैसा हो अशी घोषणाबाजी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.. नाना पटोलेंना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केलीय.तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत तिन्ही पक्ष बसून ठरवू असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय...

पवारांच्या विधानाला ठाकरेंचा विरोध 

एकीकडे ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असं शरद पवारांनी स्पष्टच सांगितलंय. मात्र याच संख्याबळाच्या मुद्याला उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोरच विरोध केला होता.

'पाडापाडीच्या राजकारणाची पुनरावृत्ती नको'

संख्याबळावरुन पाडापाडीच्या राजकारणाची पुनरावृत्ती नको असं उद्धव ठाकरे शरद पवारांसमोरच जाहीरपणे म्हणाले होते.. तेव्हा उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी जाहीर केलेला मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला पटणार का यावर प्रश्नचिन्हच आहे.. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलाय.