अकोल्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर, हे आहे कारण

 जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी चार भाजप आणि एक मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला 

Updated: Oct 2, 2019, 09:32 AM IST
अकोल्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर, हे आहे कारण title=

अकोला : अकोला जिल्ह्यातिल पाच पैकी एक विधानसभा शिवसेनेला दिल्याने अकोल्यातील शिवसैनिकांन मध्ये नाराजीचा सुर पसरलाय...संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी पक्ष प्रमुखांची दिशाभूल केल्याचा आरोपही शिवसैकांनी केला आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी चार भाजप आणि एक मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज झाले आहेत. तर संपर्क प्रमुख केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि जिल्हा प्रमुख तथा बाळापूरचे उमेदवार नितीन देशमुख यांनी पक्ष प्रमुखांची दिशाभूल केली असल्याचा आरोप सहायक सम्पर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केला आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या बुथची माहिती चुकीची तयार करून पक्ष प्रमुखांना देण्यात आली असल्याचं आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला आहे.

तर जिल्ह्यातून केवळ बाळापूर मतदारसंघात सेनेची स्थिती मजबूत असल्याचं दाखवून जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी तिकीट मिळवल्याचा आरोप केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनीही जिल्ह्यातील पक्षाची स्थिती योग्यप्रकारे मांडली नाही त्यामुळे भाजपला सरळसरळ मदत करण्यात आल्याचा आरोप सहायक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केला. 

त्यामुळे नगरसेवक, पदाधिकारी माजी आमदारांना मध्ये नाराजीचा सुर पसरलाय, तर उद्या या निवडणुकीत कुणाला मदत करायची याचा निर्णय उद्या घेण्यात येणार आहे. शिवसैनिकांनी पुकारलेला हा विद्रोह खरचं नाराजी आहे की या मागे कुणाचा षडयंत्र ? हा एक सवाल उपस्थित होत आहे.