मुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला

रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत

Updated: Oct 4, 2019, 12:44 PM IST
मुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला  title=

मुक्ताईनगर, जळगाव : विधानसभा निवडणूक २०१९ साठी मुक्ताईनगरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपाकडून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आलीय. शेवटपर्यंत उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नात असलेल्या खडसेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मात्र पक्षाचा निर्णय कटू असला तरी स्वीकारल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यादेखील उपस्थित होत्या. रोहिणी खडसे यांच्या डोळ्यांत मात्र यावेळी पाणी पाहायला मिळालं. अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे बंडखोरी करणार का? या चर्चांणा मात्र या निमित्तानं पूर्णविराम मिळालाय. 

'पत्रकार परिषदेत पक्षाच्या आदेशाचा सन्मान करण्याचं आवाहन खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. पक्षाचा निर्णय आपल्या हिताचा आहे, असं समजून आपण काम करू. आत्तापर्यंत भाजपाला जिंकून देण्यासाठी मला प्रेम दिलं तेच यापुढे रोहिणीला द्या...' असं आवाहन खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

उमेदवार उशिरा जाहीर केली असली तरी घरातील उमेदवारी असल्याचा आनंद असल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं. रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत.