Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...

Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास...   

सायली पाटील | Updated: Jul 4, 2024, 08:40 AM IST
Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर... title=
team india returns to country with t20 world cup winning trophy pm modi breakfast meeting open bus road show

Team India in Delhi : टी20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावणारा भारतीय क्रिकेट संघ भारतात कधी परतणार याचीच उत्सुकता प्रत्येत क्रिकेप्रेमीला आणि प्रत्येक भारतीला लागली होती. पण, बार्बाडोसमध्ये, जिथं या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला तिथं आलेल्या वादळामुळं संघाची घरवापसी लांबणीवर पडली. सरतेशेवटी बीसीसीआयच्या प्रयत्नांनी संघ मायदेशी परतला. 

बेरिल वादळाच्या तडाख्यामुळं प्रभावित झालेला भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी 6.10 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानानं दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर तोबा गर्दी पाहायला मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे तिथं भारतीय क्रिकेट संघाचा विमानप्रवास सुरु असताना इथं देशवासियांची पापणीही लवली नव्हती. जाणून आश्चर्य वाटेल, पण भारतीयांनी चक्क टीम इंडिया ज्या विमानानं प्रवास करत होती तो संपूर्ण प्रवास रात्रभर ट्रॅक केला. 

जवळपास 16 तासांच्या या प्रवासामध्ये अप्रत्यक्षरित्या कोट्यवधी भारतीयसुद्धा संघातील प्रत्येक खेळाडूसोबत होते. बहुसंख्य देशवासियांनी संघ प्रवास करत असणाऱ्या विमानाचं Live Tracking केलं आणि एक कमाल  विक्रम रचला. 

हेसुद्धा वाचा : Team India: It's Home! टी-20 वर्ल्डकप घेऊन अखेर रोहित सेना भारतात दाखल; स्वागताला चाहत्यांची गर्दी

team india return

क्रिकेटसंघाला मायदेशी आणणाऱ्या एअर इंडियाच्या स्पेशल फ्लाइट 'AIC24WC' नं बुधवारी बार्बाडोस इथून उड्डाण भरलं. ज्यानंतर फ्लाईट ट्रॅकिंग पोर्टल फ्लाइटराडार24 वर हे विमान ट्रॅक करत भारतीयांनी त्याला जगातील सर्वाधिक ट्रॅक केल्या जाणाऱ्या विमानाचा दर्जा दिला. फ्लाईट ट्रॅकिंग पोर्टलच्या रिअल टाईम डेटानुसार एका वेळी तर जवळपास 5252 युजर्स या फ्लाईटवर नजर ठेवून होते. 

काय आहे भारतीय संघाचं वेळापत्रक... 

06.10 वाजता: दिल्ली विमानतळावर आगमन
06.45 वाजता: आयटीसी मौर्य, दिल्ली येथे आगमन
09.00 बजे: आईटीसी मौर्या से पीएम आवास के लिए रवानगी
10.00 ते 12.00 वाजता: पंतप्रधानांची भेट
12.00 वाजता: पुन्हा आयटीसी मौर्यच्या दिशेनं रवाना
12.30 वाजता: आयटीसी मौर्य ते दिल्ली रोखानं प्रवास
14.00 वाजता : मुंबईसाठी प्रवास 
16.00 वाजता: मुंबई विमानतळावर आगमन
17.00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
17.00 ते19.00 वाजेपर्यंत: ओपन बस परेड
19.00 ते 19.30 वाजता: वानखेड़े स्टेडियममध्ये समारंभ 
19.30 वाजता : ताज हॉटेलच्या दिशेनं प्रवास