close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'महाराष्ट्रात ५० ठिकाणी हिरवा झेंडा रोवणार'; ओवेसींना विश्वास

हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा एक भाग आहे. औरंगाबादमध्ये तो रोवला गेलाय

Updated: Oct 13, 2019, 11:41 PM IST
'महाराष्ट्रात ५० ठिकाणी हिरवा झेंडा रोवणार'; ओवेसींना विश्वास

मालेगाव : हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा एक भाग आहे. औरंगाबादमध्ये तो रोवला गेलाय, आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ५० ठिकाणी हिरवा झेंडा रोवला जाणार असल्याचा विश्वास एमआयएम खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी व्यक्त केला आहे. मालेगाव मध्य मतदार संघातील एमआयएम उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

तसंच पंतप्रधानांनी चेन्नई किनारपट्टीवर केलेल्या स्वच्छता मोहिमेची खिल्ली उडवली आहे. देशातील सर्वच फटाके एकत्र केले तरी माझी  बरोबरी करू शकत नाही, असं ओवेसी म्हणाले. काँग्रेस एवढी कमोजर झाली आहे की, जगातील कोणतंच औषध काँग्रेसला पूर्वपदावर आणू शकत नसल्याचं म्हणत ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी एमआयएमचा समाचार घेतला होता. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाची खंत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून व्यक्त केली होती.

औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला एमआयएमचा समाचार