Love Crime : गर्लफ्रेंड बोलत नाही, फोन उचलत नाही; बायफ्रेंड चिडला भर रस्त्यात तिला गाठलं आणि...

रागाच्या भरात प्रियकराने असे काही कृत्य केले की दोघांचा जीव धोक्यात आला. 

Updated: Jan 31, 2023, 07:29 PM IST
Love Crime : गर्लफ्रेंड बोलत नाही, फोन उचलत नाही; बायफ्रेंड चिडला भर रस्त्यात तिला गाठलं आणि... title=

Wardha Crime News : वर्धा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे (Wardha Crime News). गर्लफ्रेंड बोलत नाही, फोन उचलत नाही चिडलेल्या बायफ्रेंडने धक्कादाय कृत्य केले आहे. प्रेयसी बोलत नसल्याने माथेफिरु प्रियकराचा राग अनावर झाला. त्याने प्रेयसीला रस्त्यात औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  प्रियकरानेही विषारी औषध घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. 

हिंगणघाट येथील बारामती सिटी जवळ ही घटना घडली आहे. पीडीत मुलीचे वय 19 वर्षे आहे. औषध पाजून  प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही याच गोष्टीचा राग मनात धरुन प्रियकाराने तिच्यावर हल्ला केला.

आरोपी हा 22 वर्षांचा आहे. पीडित तरुणी काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर पडली होती. यावेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या प्रियकराने तिला वाटेत गाठले. जबरदस्तीने त्याने तिला आपल्या बाईकवर बसवून निर्जन स्थळी नेले. येथे या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर या माथेफिरु तरुणाने सोबत आणलेले विषारी औषध प्रेयसीला पाजले.  दरम्यान, तरुणाने देखील औषध पीत स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. विषारी औषधामुळे तरुणीची प्रकृती बिघडली.  तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  पीडितेची तक्रार आणि वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी माथेफिरू तरुणावर गुन्हा दाखल केलाय. हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वॉर्डात राहणाऱ्या आरोपी अमन निखार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिक्षक असलेल्या तरुणीला भर रस्त्यात जिवंत जाळले

वर्ध्यातील हिंगणघाट येथे झालेल्या जळीत हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. शिक्षक असलेल्या तरुणीला भर रस्त्यात जिवंत जाळण्यात आले होते. विकेश नगराळेने असे आरोपीचे नाव आहे.  3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट इथं आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होते. यांत ही तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती.  10 फेब्रुवारी 2020 तरुणीचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला होता. यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात आला होता. यानंतर  तब्बल दोन वर्षानंतर 2022 मध्ये आरोपी विकेश नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.