सांगलीत तीन तरुण, दोन महिलांवर प्राणघातक हल्ला

सांगलीतील कारंदवाड़ी गावात तीन तरुणांवर आणि दोन महिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 

Updated: Dec 10, 2017, 03:42 PM IST
सांगलीत तीन तरुण, दोन महिलांवर प्राणघातक हल्ला title=

सांगली : सांगलीतील कारंदवाड़ी गावात तीन तरुणांवर आणि दोन महिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 

10 ते 15 जणांच्या टोळी ने हा हल्ला केला. त्याचप्रमाणे घरातही त्यांनी तोडफोड केली. या हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि काठ्यानं जबर मारहाण केलीय. 

या तिघांच्या डोक्याला जबर मार लागलाय. तर एकाचं बोट तोडलंय. आणि महिलांनाही जबर मारहाण केलीय. हॉटेलमध्ये जेवणाची उधारी मागितल्याचा राग मनात धरुन मारहाण केलीय.