नागपूर : मध्य नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्या जनसंपर्क कार्यलयाशेजारीच त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाला गुंडांनी मारहाण केलीय. गोळीबार चौकात प्रचंड हैदोस घातला.
रविवारी रात्री गुंडांनी गोळीबार चौक परिसरात लोखंडी रॉड व काठीने अनेक गाड्यांची तोडफोड केली. गुंडांच्या हल्ल्यात तीन जण जखमीही झालेत. गुंडांच्या तोडफोडीचे व हैदोसाचे सीसीटीव्ही फुटेज झी मीडियाला हाती लागलंय.
कुंभारे यांचे खासगी स्वीय सहाय्यक योगेश वाकोडीकर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर एक तासाने सुमारे 15 ते 20 गुंड परिसरात रॉड व काठ्या घेवून पोहोचले. त्यांनी वाकोडीकरांना माराहाण केली. त्यांचे मित्र विनोद गडीकरांवरांही हल्ला केला. मित्र विनोद गडीकर यांच्यावरही हल्ला केला. हल्ल्यात विनोद गडीकर यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे.
याशिवाय अजून दोन जणही या हल्ल्यात जखमी झाले आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे. मात्र या घटनेनंतर गोळीबार चौक परिसरात राहणा-या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.