म्हसवड आरोग्य केंद्राची तोडफोड, दोघांना अटक

सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथं शासकीय आरोग्य केंद्रावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. 

Updated: Jun 10, 2017, 10:30 PM IST
म्हसवड आरोग्य केंद्राची तोडफोड, दोघांना अटक  title=
प्रातिनिधिक फोटो

सातारा : सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथं शासकीय आरोग्य केंद्रावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. 

बुलेटवरुन आलेल्या दोघांनी आरोग्य केंद्रात घुसून कर्मचा-यांना धमकावलं. तसंच इमारतीतील आणि वैद्यकिय अधिकारी कक्षातील काचा फोडल्या. यावेळी वैद्यकीय उपकरणांची नासधूस करण्यात आलीय. 

शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या शंभराहून अधिक अॅम्ब्युलन्सचंही यावेळी नुकसान करण्यात आलंय. या हल्ल्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केलीय.