अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ, पोलिसाला जबर मारहाण

अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ सुरू आहे. जुगार खेळणाऱ्या तीन गुंडांनी भर बाजारात पोलिसाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. 

Updated: Mar 28, 2019, 09:51 PM IST
अहमदनगर जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ, पोलिसाला जबर मारहाण title=

अहमदनगर : जिल्ह्यात गावगुंडांचा धुमाकूळ सुरू आहे. राहात्यात सोरट पान नावाचा जुगार खेळणाऱ्या तीन गुंडांनी भर बाजारात पोलिसाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. यात मारहाणीत पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालकर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोरट पान नावाचा जुगार खेळण्याच्या वादात या तीन गुंडांनी एका मजुराल मारहाण केली. याची चौकशी करण्यासाठी सुनील मालदार गेले असता जुगार चालवणाऱ्या विकी चावरे, भावड्या शाक, प्रकाश आरणे या तिघांनी एका लाकडाच्या दांडक्यानं बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. 

राहात्यामध्ये बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात. पिंपळवाडी येथे विटभट्टीवर काम करणारा मजूर आठवडा बाजारात आला होता. बाजार करताना एका सोरटच्या ठिकाणी त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने बळजबरी करत खेळण्यासाठी बसविले. परंतु त्याने खेळण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याच्याकडील पैसे टोळक्याने हिसकाऊन घेत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मजुराच्या डोक्याला मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. त्याने जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले. त्याने तक्रार केली. पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर हा त्याच्या सोबत संबंधित टोळक्याला पकडण्यासाठी गेले. गावगुंडाच्या टोळक्याने मागे पुढे न पाहाता पोलीस कॉन्स्टेबल मालणकर यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. मारहाण होत असतानाही मालणकर यांनी टोळक्यातील एकाला पकडून ठेवले. पोलिसांना त्याला ताब्यात घेत अटक केली.