Kalyan Crime News : देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कल्याणमध्ये ही खळबळ घटना घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
कल्याण पूर्वेच्या होम बाबा टेकडीवर हा प्रकार घडलाय.पीडित महिला या टेकडीवर असलेल्या देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनासाठी जात होती. त्या वेळेस वाटेत एका अज्ञाताने पीडितेला अडवत तिच्या वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस या महिलेने त्याला प्रतिकार केल्यानंतर पुढचा अनर्थ टाळला. मात्र, या आरोपीने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्यास यशस्वी झाला.या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल येऊन पाहणी करून पुढचा तपास सुरू केला.
असाच प्रकार डोंबिवली परिसरात देखील घडला होता. 9 सप्टेंबर रोजी एक महिला डोंबिवलीच्या खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथे रिक्षातुन घरी येत होती. यावेळी महिलेचे रिक्षा चालकाने तिचे अपहरण केले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्या वर साथीदाराच्या मदतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
कल्याण शहरात महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रसिका कोळंबेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विजय जाधव या ओळखीच्या व्यक्तीनेच रसिकाची हत्या केली आहे. कल्याण पूर्वेच्या विजयनगर आमराई परिसरात हत्येचा हा प्रकार घडलाय. रसिका आणि विजय हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.विजय हा रसिका च्या चारित्र्यावर संशय घेत होता,त्यावरूनच दोघांमध्ये वाद होत होते.आज देखील याच कारणावरून रसिका आणि विजय मध्ये वाद झाले.त्यानंतर विजयने रसिकाच्या घरी जाऊन सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर आणि अंगावर इतर ठिकाणी वार करून तिची निर्घृण हत्या केली.या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी विजय ला ताब्यात घेतले आहे.मात्र दिवसाढवळ्या ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.