औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झी 24 तासानं उघड केल्यावर आता कार्यकारी अभियंता राजेंद्र काळेंवर कारवाईच्या बाबतीत आता सरकारकडून टाळाटाळ होतेय.
आरोपात तत्थ असलं तरी कारवाई कुणी करायची यावरून आता घोळ समोर येऊ लागलाय. मुख्य अभियंता राजेंद्र काळे जलसंपदा खात्यातून प्रतिनियुक्ती वर जल संधारण खात्यात आले आहेत. त्यांची आस्थापना जलसंपदा असल्याने कारवाईचे अधिकार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय.
काळेवर कारवाई व्हावी यासाठीचे पत्र जलसंपदा खात्याला दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलंय, त्यामुळं आता जलसंपदा मंत्री नक्की कारवाई कधी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे?