देशातलं कृषीसंकट ओळखून संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं - पी. साईनाथ

देशातलं कृषीसंकट खूप मोठं असून दिवसाला 2 हजार शेतकरी संपत आहे. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केलीय. 

Updated: Jan 10, 2018, 11:03 AM IST
देशातलं कृषीसंकट ओळखून संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं - पी. साईनाथ title=

पुणे : देशातलं कृषीसंकट खूप मोठं असून दिवसाला 2 हजार शेतकरी संपत आहे. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केलीय. 

अधिवेशनात शेतक-यांनाही व्यथा मांडू द्या असंही ते म्हणालेत. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आयोजित प्रकाशन समारंभ कार्यक्रम ते बोलत होते.

89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजी अनुवाद - ‘डायलॉग ॲण्ड डायलेक्टीक - अ सेल्युलर पर्स्पेक्टीव्ह’ या ग्रंथांचं प्रकाशन पी. साईनाथ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.