शिक्षक चक्क वर्गात झोपा काढतोय आणि मुलं पाहा काय करतायेत...

शिक्षक झोपा काढतोय. वाचून धक्का  बसला ना. ही गोष्ट खरी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडसावंगी  जिल्हा परिषद शाळेतला प्रकार पुढे आलाय. मुलांना खेळायला सोडून गुरुजींची निवांत झोप काढण्यात मग्न आहेत.

Updated: Jul 4, 2018, 10:00 PM IST
शिक्षक चक्क वर्गात झोपा काढतोय आणि मुलं पाहा काय करतायेत...

औरंगाबाद : शिक्षक झोपा काढतोय. वाचून धक्का  बसला ना. ही गोष्ट खरी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडसावंगी  जिल्हा परिषद शाळेतला प्रकार पुढे आलाय. मुलांना खेळायला सोडून गुरुजींची निवांत झोप काढण्यात मग्न आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या एका गुरुजींनी आराम करण्यासाठी भन्नाट कल्पना लढवली आहे.अभ्यास तासिकेच्यावेळी विद्यार्थ्यांना खेळायला बाहेर पाठवून गुरुजींनी विद्यार्थ्यांचे दप्तर डोक्याखाली घेऊन थेट झोप काढली. हे गुरुजी नेहमीच असं करायचे मात्र काही पालकांनी एक दिवस शाळेत येऊन सगळा प्रकार पहिला आणि त्याचा व्हीडिओ सुद्धा बनवला. 

लाडसावंगी गावाजवळच्या शाळेतील हा प्रकार आहे.  यानंतर पालकांनी शाळेत गोंधळ घालत शिक्षकांवर कारवाईची मागणी केलीये. राजू शिंदे असं गुरूजींचं नाव आहे.