या घटनेचा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, देव तारी त्याला कोण मारी

महिलेच्या अंगावरुन भरधाव एक्स्प्रेस गेली, अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य

Updated: May 30, 2022, 07:42 PM IST
या घटनेचा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, देव तारी त्याला कोण मारी title=

औरंगाबाद : 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण आपण प्रत्येकाने ऐकली असेल. आज या म्हणीचा प्रत्ययही पाहिला मिळाला. एक्स्प्रेस अंगावरुन गेल्यानंतरही एक महिला सुखरुप होती. अंगाचा थरकाप उडवणारं असंच हे दृष्य होतं.

नेमकी घटना काय
औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक महिला ट्रॅकवरून चालत होती. त्याचवेळी ताशी 100 कि.मी. वेगानं जनशताब्दी एक्स्प्रेस आली. चालकानं हॉर्न वाजवताच ही महिला घाबरली. पण घाबरल्याने ती ट्रॅकवरच कोसळली.

आता पुढे काय होणार या भीतीने प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या लोकांनी एकच आरडाओरडा केला. त्याचवेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत तत्काळ गाडी थांबवली. पण तोपर्यंत एक्स्प्रेसचे चार डबे महिलेच्या अंगावरुन गेले होते. 

गाडी थांबतानाच लोकांनी तात्काळ धाव घेत महिलेाल बाहेर काढलं. सुदैवाने ही महिला सुखरूप होती. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.