औरंगाबाद बलात्कार प्रकरणातल्या संशयिताची आत्महत्या

खवल्या डोंगरावरुन उडी घेत आत्महत्या ...

Updated: Aug 6, 2020, 10:22 PM IST
औरंगाबाद बलात्कार प्रकरणातल्या संशयिताची आत्महत्या

औरंगाबाद : औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील एका संशयित आरोपीने आत्महत्या केली आहे. खवल्या डोंगरावरुन उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांना शरण जा असं, आरोपीचा भाऊ त्याला सांगत होता, त्याच वेळी आरोपीने आत्महत्या केली. 

दोन दिवसांपूर्वी तरुणी आपल्या मित्रासोबत खवल्या डोंगर भागात फिरायला गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्या मित्राला आणि तिला अडवलं होतं. आरोपीने तरुणीच्या मित्राला मारहाण केली. तरुणीवर अत्याचार केला होता. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरु होता. 

पोलीस तपासात आरोपी कोण आहेत, ते समोर आलं होतं. तपासात आरोपीबाबतची माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोपीच्या भावाने त्याला पोलिसांना शरण जाण्याबाबत सांगत होता, त्यावेळी आरोपीने खवल्या डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.