मोबाईलच्या अतिवापरावर बाबा रामदेव म्हणतात...

मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त केलं पाहिजे असं ते म्हणाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2018, 12:50 PM IST
मोबाईलच्या अतिवापरावर बाबा रामदेव म्हणतात...

चंद्रपूर : मोबाईलच्या अतिवापरावर बाबा रामदेव यांनी सडकून टिका केली आहे. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त केलं पाहिजे असं ते म्हणाले.

महिला संमेलनात बोलताना बाबा रामदेव म्हणाले...

चंद्रपुरातील चांदा क्लब मैदानावर आयोजित महिला संमेलनात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. लहान मुलांच्या हातात मोबाईल देणारे पालकच मुलांचे शस्तूर आहेत, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. 

आयुर्वेद आणि योगासनांचं महत्त्व

पतंजली योगपीठाच्या वतीनं चांदा क्लब मैदानात महिलांसाठी विशेष संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात त्यांनी महिलांना आयुर्वेद आणि योगासनांचं महत्त्व पटवून दिलं. 

या कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर आणि ग्रमविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते.