बदलापूर : माघी गणेशोत्सवानिमित्त बदलापूरच्या स्टेशनपाडा भागात भव्य महाल उभारण्यात आलाय. बदलापूरचा राजा आशी या मंडळाची ओळख असून मंडळाचं यंदाचं ५० वं वर्ष आहे.
२० फुटी बाप्पा
त्यानिमित्ताने प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा महाल उभारलाय.आकर्षक सजावट, सुंदर नक्षीकाम, पडदे, कारंजे आणि अर्थातच भव्यता पाहायला मिळत आहे.
आत्तापर्यंत फक्त मुंबई ठाण्यातच पाहायला मिळणारी अशी सजावट यंदा पहिल्यांदाच बदलापुरात करण्यात आलीये एखाद्या चित्रपटाच्या सेटलाही मागे टाकेल, अशा या महालात २० फुटी बाप्पा विराजमान झालेत.
१० दिवस जत्रा
गणेशोत्सवा निमित्त आजपासून इथे १० दिवस जत्राही भरलीये.. त्यामुळे हा भव्य महाल पाहण्यासाठी आणि जत्रेची मजा घेण्यासाठी भाविक इथे गर्दी करु लागलेत.
बदलापूरात २० फुटी बाप्पा विराजमान