बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...

बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 20, 2024, 06:12 PM IST
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...  title=

Badlapur Protests:  बदलापूर आंदोलनाबाबत मोठी अपडेट सोमर आली आहे. आंदोलक आंदोलन मागे घेत नसल्याने पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. जमावाला मागे हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आहे.  जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलांनी दगडफेक केली आहे. पोलिस आणि आंदोलक यांच्यात धमश्चक्री सुरु असल्याचे चित्र बदलापूर रेल्वे स्थानकात पहायला मिळत आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. अनेक आंदोलक यात जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

दलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय. सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी रेल्वे स्टेशन ताब्यात घेतले असून पोलिस आंदोलकांना पांगवण्याचे प्रयत्न  करत  आहेत. 

बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरु असताना संतप्त पालकांनीही शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलंय.. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारलाय.  दरम्यान याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणा-या सेविकांना निलंबित करण्यात आलंय.. तसंच कंत्राटी पद्धतीनं सुरु असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आलाय.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या पोलिस निरिक्षकाचीही बदली  करण्यात आलीये.

गिरीश महाजनांची चर्चा निष्फळ 

आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय.. सरकारकडून गिरीश महाजन, आमदार किसन कॅथोर, आमदार बालाजी किणीकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय.. मात्र, आंदोलक मागणीवर ठाम असल्यानं आंदोलकांसोबतची गिरीश महाजनांची चर्चा निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालंय.. त्यामुळे महाजन आंदोलनस्थळावरून माघारी गेलेत..