वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटना

बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 9, 2024, 03:35 PM IST
वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटना

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला.. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.  गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका  तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसांपूर्वी या तरुणीने  तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर तरुणीने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेवर तरुणीच्या घरी एका मित्राने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी तरुणीशी संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितलं. त्यामुळे पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा बलात्कार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण साताऱ्याहून आलेला शिवम राजे(22) आणि संतोष रुपवते (40) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More