बदलापुरचा होम प्लॅटफॉर्म पुन्हा चर्चेत; आता प्रवासी नाही तर महाविकास आघाडी झालेय आक्रमक

Badlapur News : बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनावरुन वाद होण्याची शक्यता आहे. माहविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Updated: Feb 20, 2024, 05:18 PM IST
बदलापुरचा होम प्लॅटफॉर्म पुन्हा चर्चेत; आता प्रवासी नाही तर महाविकास आघाडी झालेय आक्रमक title=

Badlapur Railway Station : बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता प्रवासी नाही तर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटना महाविकास आघाडीने विरोध केला आहे. उद्‌घाटन केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील महाविकास आघाडीने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. 

बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मविरोधात महाविकास आघाडीची आक्रमक का?

बदलापूर होम प्लॅटफॉर्म सुरवाती पासून कायमच वादात सापडले आहे.  आता पुन्हा एकदा या होम प्लॅटफॉर्मच्या उद्‌घाटनावरून वाद होण्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत.  महाविकास आघाडीने आक्रमक होत अर्धवट रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उद्‌घाटनास विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.  येत्या 24 तारखेला होम प्लॅटफॉर्म चे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. मात्र अजूनही होम प्लॅटफॉर्मचं अनेक काम अपूर्ण असतांना , निवडणुका डोळ्यासमोर ठेवून  उद्‌घाटन करण्यायाचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.  त्यामुळे आता पुन्हा एकदा होम प्लॅटफॉर्म वरून वाद होण्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत. 

नेमका काय आहे बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मचा वाद

बदलापुरच्या  एक नंबर प्लॅटफॉर्मवर लोकल नियोजित जागेपेक्षा पुढे थांबत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता.  रेल्वे प्रशासनाने थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद केला आणि होम प्लॅटफॉर्म प्रवास करण्याच्या सूचना प्रवाशांना केल्या. एक नंबरचा प्लॅटफॉर्म बंद केल्यामुळं आता मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  होम प्लॅटफॉर्मवरुनच लोकल पकडावी लागत आहे.  बदलापूर रेल्वे स्थानाकात दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या मागणीनंतर होम प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलाचे काम हाती घेण्यात आले. फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी पश्चिम दिशेला होम फलाट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. 2019 मध्ये या कामाचे भूमिपूजन झाले.  ऑक्टोबर 2023 पर्यंत बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, होम प्लॅटफॉर्मचे पूर्ण झालेले नाही. फलाट क्रमांक 1 बंद केल्यानंतर  होम प्लॅटफॉर्मचा पर्याय रेल्वे प्रवाशांना देण्यात आला. याचे अद्याप सुरु आहे. अजूनही होम प्लॅटफॉर्मवर  लाद्या बसवणे, संरक्षक भिंती उभारणे, छत बसवणे, पायऱ्या तयार करणे अशी कामे सुरू आहेत. अपूर्ण होम प्लॅटफॉर्मवरूनच प्रवासी करत आहेत. काम पूर्ण झालेले नसताना रेल्वे प्रशासनाने बदलापूर होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. यामुळे महाविकास आघाडीने याला विरोध केला आहे.