जुळया बहिणींचा दहावीचा निकालही 'सेम टू सेम'

 रिद्धी व्यापारी आणि सिद्दी व्यापारी या दोन जुळ्या बहिणींना १० वीत सेम टू सेम टक्केवारी मिळाली आहे.

Updated: Jun 11, 2019, 08:16 PM IST
जुळया बहिणींचा दहावीचा निकालही 'सेम टू सेम' title=

बादलपूर : दहावीचा निकाल नुकताच लागला असून यावेळीही मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. राज्यभरात निकालाच्या आनंदात विद्यार्थी असताना बादलपूर येथून आणखी एक सुखावह बातमी आहे. दहावी निकालानंतर अंबरनाथ तालुक्यातील जुळ्या बहिणींची सर्वत्र मोठी चर्चा आहे. अंबेशिव भिनारपाडा गावातील रिद्धी व्यापारी आणि सिद्दी व्यापारी या दोन जुळ्या बहिणींना १० वीत सेम टू सेम टक्केवारी मिळाली आहे.

शनिवारी १० वीचा ऑनलाईन निकाल लागला. या निकालात रिद्धी आणि सिद्धीला ८४ टक्के मार्क मिळाले. इतकच काय तर हिंदी आणि इंग्लिश या विषयात दोघीना सारखेच गुण आहेत. इतर विषयात देखील दोघींमध्ये एक एक मार्कांचा फरक आहे. त्यांच्या १० वीतील या सारख्याच यशामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना  देखील गाव खेड्यातील या जुळ्या बहिणीच्या १० वीतील यशामुळे त्याच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे. 

अंबेशीवमधील सानेगुरुजी शाळेत या बहिणी दुसऱ्या आल्या आहेत. लहानपणापासून दोघींच्या आवडी निवडी या बहुतांश सारख्या आहेत. विशेष  म्हणजे एकाच पुस्तकावर दोघींनी 10 वीचा आभ्यास केला आहे. आता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन बँकेत नोकरी करण्याची त्यांची इच्छा आहे.