जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार?

Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 19, 2024, 06:25 PM IST
जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार? title=

Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं (Janhvi Kapoor) नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जान्हवी आणि शिखर पहाडिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ही दोघ नुकताच अनंत अंबानी आणि राधिकी मर्चंट यांच्या पार्टीत दिसले होते. आता शिखर पहारिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी जान्हवी कपूरमुळे नाही तर राजकारणामुळे. शिखर पहारिया (Shikhar Pahariya) लवरकच राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे.

कोण आहे शिखर पहारिया?

शिखर पहारिया हा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा नातू आहे. शिखर पहारिया राजकारणात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही परिस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांना आपला सोलापूर शहर मध्य विधानसभेचा काँग्रेसचा बालेकिल्ला आबाधित ठेवायचा आहे. यासाठी शिंदे परिवारातीलच सदस्य हवा अशी मागणी जोर धरत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शिखरच्या माध्यमातून आपला हुकमी एक्का बाहेर काढल्याची चर्चा आहे.

शिखरने सुरु केल्या भेटीगाठी

खासदार प्रणिती शिंदे या केंद्रात तर शिखर पहारीया राज्यात अशीच चर्चा काँग्रेसच्या गोटात दिसून येतेय. शिखर पहारिया याने सोलापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने सोलापूरकरांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत... मात्र शहर मध्यच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे काय ? असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे.

शिखर पहारीया हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू जरी असला तरी तो मुंबईत मोठे उद्योजक आहेत. शिखर फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने अनेक सामाजिक कार्य देखील केलं आहे. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय पोलो खेळाडू आहे. त्यामुळे तो राजकारणात सक्रिय झाला तर त्याचे स्वागतच असेल अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.

भाजपची टीका

सुशीलकुमार शिंदे यांचा आपल्या नातवाला राजकारणात सक्रिय करण्याचा विषय म्हणजे सगळ्यात हास्यास्पद गोष्ट असून वडील त्यानंतर आई त्यानंतर मुलगी आणि आता नातू मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्रंज्याच उचलायच्या का ? असा सवाल भाजपाने उपस्थित केलाय. आता येणाऱ्या काळात शिखर पहारिया राजकारणात सक्रिय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.