IND VS BAN 1st Test R Ashwin Father Enjoy His Bating : आर अश्विन हा खरंतर भारताचा दिग्गज गोलंदाज आहे. मात्र वेळ आल्यावर फलंदाजीतही आपण चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे पहिला टेस्ट सामना खेळवला जात आहे. गुरुवारी या सामन्याच्या पहिल्याच दिवशी आर अश्विनने सातव्या विकेटसाठी जडेजासह फलंदाजी करताना 195 धावांची पार्टनरशिप केली. यासह त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये आपले 5 वे शतक ठोकले. यावेळी अश्विनचे वडील रविचंद्रन हे स्वतः स्टॅन्डमध्ये हजर होते.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत - बांगलादेश यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या फलंदाजीची अवस्था पाहून बांगलादेशची बॉलिंग भारतावर हावी पडणार असे वाटतं होतं, परंतु अश्विन आणि जडेजाच्या जोडीने ते खोटं ठरवलं. कॅप्टन रोहित शर्मानंतर शुभमन आणि मग विराट कोहलीची स्वस्तात विकेट पडल्यावर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली होती. तेव्हा यशस्वी - पंत नंतर अश्विन - जडेजाने भारताच्या फलंदाजीची बाजू सांभाळली. टीम इंडिया 34 धावांवर असताना यशस्वीने झुंजार अर्धशतक ठोकलं तर ऋषभ पंतने 39 धावांची खेळी केली. त्यानंतर आर अश्विन आणि जडेजाने झुंज देऊन भारताची धावसंख्या 300 पार पोहोचवली.
आर अश्विनने 108 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. त्याने या दरम्यान 10 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. अश्विनची ही वादळी खेळी पाहून हेड कोच गौतम गंभीरही चकित झाला. अश्विनने काही दोन दिवसांपूर्वीच त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. अश्विनने गुरुवारी बांगलादेश विरुद्ध टेस्ट क्रिकेटमधील ५ वे शतक ठोकले. यावेळी त्याची खेळी पाहण्यासाठी त्याचे वडील रविचंद्रन उपस्थित होते. अश्विन मैदानात चौकार ठोकत असताना कॅमेरा वडील रविचंद्रन यांच्याकडे फिरवण्यात आला. तेव्हा वडील अश्विनची तुफानी बॅटिंग एन्जॉय करताना दिसले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत अश्विनचे वडील त्याच्यासाठी आज 'लकी' ठरले असे अनेकांचे म्हणणे होते.
I still remember how people used to troll and criticize Ms Dhoni when he always kept Ashwin and Jadeja in the eleven, they used to say csk quota, friendship quota, balah balah & what not,
& Then today see both are among the greatest Test players. pic.twitter.com/1kCrFFkM6D
— ` (@kurkureter) September 19, 2024
Ravi Ashwin's father enjoying Ashwin masterclass at Chepauk. pic.twitter.com/yN9sGqBCFk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2024
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा