close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मोदींना नवस बोलला तर आता मुलंदेखील होतील'

बाळू धानोरकर यांची मिश्किल टिपण्णी

Updated: Oct 13, 2019, 10:21 AM IST
'मोदींना नवस बोलला तर आता मुलंदेखील होतील'
फाईल फोटो

चंद्रपूर : महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचार रंगू लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी भद्रावती इथे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. 

ग्रामपंचायतीत जिंकायची लायकी नाही ते मोदींच्या नावावर आमदार, खासदार झाले. मोदींमुळे जर हे होऊ शकते तर 'मोदींना नवस बोलला तर आता मुलं देखील होऊ शकतील' अशी मिश्किल टिपण्णी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. 

तर देशात सध्या दडपशाही सुरु असून ईडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) वापर काँग्रेस नेत्यांविरोधात करण्यात येत आहे असं सांगत काँग्रेसप्रमाणेच शरद पवारांवरही हात टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे वक्तव्य मुकुल वासनिक यांनी केले.

काही महिन्यांपूर्वी बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.