Jalgaon Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत बँड बाजा सरपंच! भाऊने अख्खं पॅनल आणलं अन् विरोधकांची काढली वरात

Jalgaon Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका बँडवाल्याने विरोधी पॅनलचा बाजा वाजवला आहे. 

Updated: Dec 21, 2022, 09:44 AM IST
Jalgaon Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत बँड बाजा सरपंच! भाऊने अख्खं पॅनल आणलं अन् विरोधकांची काढली वरात title=

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे ( Jalgaon Gram Panchayat Election Result 2022 ). जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झाला. पराभूत गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप मृत सदस्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर जामनेरमध्ये तणावाचं वातावरण पसरले आहे. मृतदेह रुग्णालयात ठेवल्याने उपजिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होत आहे. निकालानुसार शिंदे-भाजप गटाने सरशी मारली आहे. निकालाच्या या रणधुमाळीमध्ये जळगावात एक दुर्देवी घटना घडली, निकालानंतर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये विजयी सदस्याचा मृत्यू झाला. यामुळे जळगावमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशातच जळगावमधून एक पॉझिटिव्ह बातमी समोरआली आहे. (Bandwala defeated the entire opposing panel in Gram panchayat Election jalgaon news)
 
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका बँडवाल्याने विरोधी पॅनलचा बाजा वाजवला आहे. जळगावमधील एरंडोल तालुक्यामधील अंतुर्ली खुर्दच्या ग्रामपंचायतीमध्ये कांतीलाल सोनवणे यांनी मोठं यश मिळवलं आहे. कांतीलाल निवडणुकीला उभेच नाही राहिले तर त्यांनी एक पॅनलही उभा केला होता. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सोनावणेंनी प्रस्थापितांना दणका दिला. 

सोनावणेंनी उभं केलेलं पॅनलही निवडून आणत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सरपंचपदी उभ्या असलेले सोनावणे तब्बल 513 मतांनी निवडून आले. त्यासोबतच पॅनलमधील गौरव गोकुळ पाटील, कविता रघुनाथ भिल, हर्षा गौरव पाटील, राहुल दिनकर पाटील, सोनाली गोविंदा पाटील, अनिल आधार जवरे आणि प्रतिभा महेंद्रसिंग पाटील हे विजयी झाले आहेत.

आणखी वाचा - Grampanchayat Election Result 2022 : भोर, कोल्हापूरात ग्रामपंचायतीचा सर्वात धक्कादायक निकाल!

दरम्यान, कांतीलाल सोनावणे यांचा बँडचा व्यवसाय आहेत. लग्न-समारंभातील गायक-वाद्याचं कामं घेतात. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या जातीचं आरक्षण निघाले. त्यानंतर सोनावणे निवडणुकीला उभे राहिले आणि पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायतीच्या चाव्या ताब्यात घेतल्या.