SBI SCO Special Cadre Officer Recruitment PDF: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्हीदेखील बॅंकेत नोकरीचा प्रयत्न करत असाल तर एसबीआय तुम्हाला चांगली संधी देत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एसबीआय एससीओ स्पेशल केडर ऑफीरची रिक्त 150 पदे भरली जाणर आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयातून पदवीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे भारतीय प्रबंध संस्थेचे फॉरेन एक्स्चेंज फॉरेक्सचे प्रमाणपत्र असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 48 हजार 170 ते 69 हजार 810 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
यासोबतच उमेदवाराकडे कोणत्याही कमर्शियल बॅंकेत ट्रेड फायनान्सशी संबंधित कामाचा अनुभव असावा. येथे त्याच्याकडे किमान 2 वर्षाचा सुपरव्हिजनचे काम करणे अपेक्षित आहे. शैक्षणिक पात्रतेच्या व्यतिरिक्त हा अनुभव मोजला जाईल, याची नोंद घ्या.
7 जूनला याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 27 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास, किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल,याची नोंद घ्या.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके भरती अंतर्गत असिस्टंट इंटर्नची पदे भरली जाणार आहेत. बॅंकेत असिस्टंट इंटर्नच्या एकूण 32 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करत या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत सहकारी इंटर्न पदाच्या 32 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
असिस्टंट इंटर्न पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए केलेले असावे. मॅनेजमेंटमधील 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. कोऑपरेटीव्ह, अॅग्री बिझनेस,रुरल डेव्हलपमेंट यातील शिक्षण असणाऱ्यास प्राधान्य असेल. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे च्या दरम्यान असावे. आण पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 'व्यवस्थापक (OSD) HRD&M विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सर विठ्ठलदास ठाकरसे मेमोरियल बिल्डिंग, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 40001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.