Bank Jobs 2021: ग्रॅज्युएट तरुणांना नोकरीची संधी, या बँकेत सुरू Clerk Vacancy

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका! ग्रॅज्युएट तरुणांसाठी पुण्यात नोकरीची संधी

Updated: Aug 10, 2021, 09:13 PM IST
Bank Jobs 2021: ग्रॅज्युएट तरुणांना नोकरीची संधी, या बँकेत सुरू Clerk Vacancy title=

मुंबई: कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही जणांचे व्यवसाय ठप्प झाले. अशा सगळ्यात परिस्थितीत आशेचा एक किरण म्हणजे निघणाऱ्या नोकरीच्या संधी. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुमच्यासाठी ही संधी मोलाची आहे. एका बँकेनं क्लार्कच्या 356 रिक्त पदांसाठी जाहिरात दिली आहे. त्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. ह्या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊया. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC Bank) लिपिक पदाच्या रिक्त जागा भरायच्या आहेत. अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवस बाकी आहेत त्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर ही संधी सोडू नका. या बँकेत क्लर्क पदासाठी 356 जागा आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 22 हजार रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे. 

इच्छुक उमेदवारांनी  pdccbank.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. 7 ऑगस्टपासून या पदांसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. 16 ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. जनरल कॅटॅगरीतील उमेदवारांना अर्जासोबत 885 रुपये फी भरावी लागणार आहे. बाकी इतर उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार आहे. 

फी भरण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट आहे. तर 16 ऑगस्टपर्यंत अंतिम अर्ज करता येणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. या व्यतिरिक्त, आपल्याकडे MSc IT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमचे वय 21 ते 38 वर्षे असायला हवं. आरक्षित वर्गाला वरच्या वयोमर्यादेत शिथिलता मिळेल असं निवेदनात म्हटलं आहे.