सांगोला बँकेच्या 70 लाखांच्या लुटीमागे मॅनेजरचाच हात

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलाच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हॅनमधून 70 लाख रुपये लुटल्याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरलाच अटक करण्यात आली आहे. 

Updated: Nov 2, 2017, 05:40 PM IST
सांगोला बँकेच्या 70 लाखांच्या लुटीमागे मॅनेजरचाच हात title=

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलाच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हॅनमधून 70 लाख रुपये लुटल्याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरलाच अटक करण्यात आली आहे. 

सांगोलातल्या शाखेचे मॅनेजर अमोल भोसले यानंच बनाव करून 70 लाखांची कॅश लुटल्याचं समोर आलंय. अतुल भोसले याला पोलिसांनी अटक केलीय.  

तालुक्यातल्या मेथवडे फाट्याजवळ व्हॅनमधल्या सुरक्षारक्षकाच्या डोळ्यात चटणी टाकून 70 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. तसंच सुरक्षारक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. मात्र हा लुटीचा बनाव बँक मॅनेजरनंच केल्याचं पोलिसांच्या चौकशीत उघड झालं.