करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले

काही जण ढिगाऱ्याखाली अडकले.

Updated: Jul 31, 2019, 04:04 PM IST
करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले title=

सोलापूर : करमाळा येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते आहे. इमारतीमध्ये डेंटल हॉस्पिटल आणि खाली बँक ऑफ महाराष्ट्राचं कार्यालय आहे. बँकेचे काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळते आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत.

ढिगाऱ्याखालून ७ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्य़ांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ४ जणांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. एकूण २० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

करमाळा- दुर्घटनाग्रस्त इमारत पाच वर्ष जुनी आहे. इमारत मालकाने बँक ऑफ महाराष्ट्र असलेल्या इमारतीवर तात्पुरता सळई नट लावून स्लॅब तयार केलेला होता. हा स्लॅब कोसळला. वरच्या मजल्यावर डेंटल क्लिनिक असलेला हा स्लॅब कोसळला. तेव्हा दवाखान्यातील पाच लोकही सोबत खाली पडले.