Video : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा

बारामतीतील गोविंद बागेत पार पडला पाडवा   

Updated: Nov 17, 2020, 07:56 PM IST
Video : शरद पवार आणि कुटुंबीयांनी असा साजरा केला दिवाळी पाडवा
छाया सौजन्य - सोशल मीडिया

बारामती : दिवाळीच्या Diwali 2020 सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच राजकीय पटलावर सक्रिय असणारी मंडळीही यात मागे राहिलेली नाहीत. दरवर्षीप्रमाणं सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा sharad pawar शरद पवार यांच्या कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही क्षण सर्वांच्याच भेटीला आले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी या क्षणांची झलक सर्वांच्या भेटीला आणत आपल्या कुटुंबानं दिवाळी पाडवा, भाऊबीज कशी साजरा केली हे दाखवून दिलं. शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी पवार कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र जमून त्यांनी इथं हा सण साजरा केला. 

शरद पवारांचं प्रतिभा पवारांनी औक्षण केलं, अजित पवार यांनाही त्यांच्या पत्नीनं ओवाळलं. सुप्रिया सुळे यांनीही दिवाळी पाडव्यानिमित्त पतीचं औक्षण केलं. राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते रोहित पवार यांनाही पत्नी कुंती पवार यांनी ओवाळलं. 

दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्यातील अनेक कार्य़कर्ते पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामतीची वाट धरतात. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळं ही भेट घडलेली नाही. परिणामी अत्यंत साध्या पद्धतीनं पण, पारंपरिकपणा जपत हा सण साजरा करण्यात आला.