बीड : उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी १४ जण निलंबित

बीडच्या केजमधील उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 जणांना निलंबित करण्यात आलं  आहे. यांत 12 शिक्षक आणि 2 शिपाई यांचा समावेश आहे.

Updated: Mar 6, 2018, 09:52 AM IST
बीड : उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी १४ जण निलंबित title=

बीड : बीडच्या केजमधील उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 जणांना निलंबित करण्यात आलं  आहे. यांत 12 शिक्षक आणि 2 शिपाई यांचा समावेश आहे.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ही कारवाई केलीय. याशिवाय गटशिक्षण अधिकारी ढवळे यांच्या निलंबनाचा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी केज इथले गट शिक्षण अधिकारी कार्यालयात ठेवलेल्या बाराशे उत्तरपत्रिका अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही - तवडे

बीडमध्ये जळालेल्या उत्तरपत्रिका प्रकरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीय. या प्रकरणी चौकशी सुरु असून परीक्षा केंद्रप्रमुख बदलल्याची माहिती तावडे यांनी दिलीय.