बीड लोकसभा निवडणुक निकाल 2024: बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गराचे नेते बजरंग सोनावणे यांच्याल लढत होत आहे. यात पंकजा मुंडे सध्या पिछाडीवर आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 4, 2024, 04:03 PM IST
बीड लोकसभा निवडणुक निकाल 2024: बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर title=
Beed Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 Live Updates Vote Counting Lok Sabha Election pankaja munde vs bajrang sonawane Losers List Election Results in Marathi

Beed Lok Sabha Nivadnuk Result 2024 :  बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होत्या. पण आता मात्र त्या पिछाडीवर आहेत. पंकजा यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सध्या आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यापूर्वी याच मतदार संघातून प्रीतम मुंडे खासदार होत्या. सुरुवातीच्या कलांमध्ये पंकजा मुंडे 532 मतांनी पिछाडीवर आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे या खासदार आहेत. तर, पंकजा मुंडे या पहिल्यांदा लोकसभेसाठी निवडणुक लढवत आहेत. 2019मध्ये प्रीतम मुंडे या जागेवर विजयी होऊन खासदार झाल्या होत्या. त्यांना एकूण 6,78,175 मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना 2019मध्ये 5,09,807 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.  प्रीतम मुंडे यांनी सोनावणे यांचा 1,68,368 मतांनी पराभव केला होता. 

बीड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपची मजबूत पकड आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे बीड मतदारसंघावर वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतरही मुंडे कुटुंबाने हा मतरदारसंघावर वर्चस्व कायम ठेवले. 2014 आणि 2019मध्ये प्रीतम मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. 

सविस्तर वृत्त लवकरच