Beed News: शेतकऱ्यांनो सावध व्हा; फेसबूकवर जाहिरात पाहून बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला 95 हजाराचा गंडा!

विष्णू बुरगे, झी 24 तास: ऑनलाईन (Online Shoping) वस्तू खरेदीच्या नावावर अनेकांची फसवणूक (Frauds) होत असते. अशातच बीडमधील (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने चक्क एका शेतकऱ्याला सायबर भामट्यांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बीडमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे. (beed online frauds 95000 was grabbed from a farmer by posting an advertisement on facebook to sell a pair of bullocks marathi news)

Updated: Jan 23, 2023, 09:54 PM IST
Beed News: शेतकऱ्यांनो सावध व्हा; फेसबूकवर जाहिरात पाहून बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला 95 हजाराचा गंडा! title=
Cyber Crime,Online Frauds

Online Frauds: विष्णू बुरगे, झी 24 तास: ऑनलाईन (Online Shoping) वस्तू खरेदीच्या नावावर अनेकांची फसवणूक (Frauds) होत असते. अशातच बीडमधील (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने चक्क एका शेतकऱ्याला सायबर भामट्यांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बीडमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे. (beed online frauds 95000 was grabbed from a farmer by posting an advertisement on facebook to sell a pair of bullocks marathi news)

झालं असं की, कारी गावचे ज्ञानेश्वर फरताडे असं या शेतकऱ्याचे नाव असून फेसबुकवर त्यांनी ऑनलाईन बैलांची जोडी (Pair of bulls online Shoping) बुक केली. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगितले. शेतकऱ्याने विश्वास ठेऊन पैसे पाठवले. मात्र...

शेवटी बैल जोडी न मिळाल्याने आपली फसवणूक (Online Frauds) झाल्याचा त्यांच्या लक्षात आल्यानंतर बीडच्या सायबर पोलिसात अज्ञात चौघाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी ऑनलाईन व्यवहार करताना फसला आणि मोठी किंमत त्याला चुकवावी लागली.

बैल जोडी घेण्यासाठी अनेकजण बाजाराची वाट धरतात मात्र लंबी (Lampi) आजारामुळे बीड जिल्ह्यासह जवळपासच्या सर्वच शहरातील बाजार बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांना ऑनलाइनच बैलजोडी घ्यायचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. 

आणखी वाचा- Crime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या... तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!

शेतकरी बैल जोडी घेताना त्याला दात आहेत का त्याचा रंग रूपाशिवाय बैलाची शरीरवृष्टी हे सर्व पाहून बैलाची खरेदी करतात मात्र या शेतकऱ्यांना फोटो मधीलच बैलांची शरीर वृष्टी पाहिली आणि बैल घेण्याचा निर्णय घेतला मात्र या शेतकऱ्याचा त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला.

ऑनलाईन व्यवहार करताय तर सावधान...

 

अनेकजण ऑनलाईन व्यवहार करण्याच्या नादात आणि फेसबुक व्हाट्सअप आणि इतर सोशल माध्यमांवर येणाऱ्या जाहिरातीला बोलून अनेक जण व्यवहार करतात आणि व्यवहार करताना कुठलीही शहानिशा करत नाहीत त्यानंतर अनेकांची फसवणूक होते.

दरम्यान, फसवणुकीनंतर पोलिसांमध्ये (Cyber Crime) धाव घेतात मात्र अनेक हे सायबर ठग पहिल्यांदा वेगवेगळी आमिष दाखवतात आणि आम्हीच दाखवून पैशाची मागणी करून लूट करतात त्यामुळे सर्वाधिक सावधान होण्याची गरज आहे आणि जरी एखादी वस्तू आवडलीस तर पहिल्यांदा ती मागवावी आणि नंतरच आर्थिक व्यवहार करावा असं देखील तज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात येतं. अशा भूलथापांना आणि सोशल मीडियातील खरेदी व्यवहार करताना शहानिशा करूनच व्यवहार करावेत असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.