कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत - नितिन गडकरी

 कर्जमाफी केल्यानं शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली केलं आहे.

Updated: May 21, 2018, 12:22 PM IST

भंडारा : कर्जमाफी केल्यानं शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली केलं आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात येत्या २८ मे रोजी होणा-या पोटनिवडणूकीसाठी तिरोडा तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.  राज्यातील शेतक-यांची हालाखीची स्थिती, मालाला न मिळणारा भाव, वाढती बेरोजगारी याबाबतही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. या सभेत ते नाना पटोले यांच्यावर टीका करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गडकरी यांनी भाषणाची सुरुवातच शेतक-यांच्या मुद्दयांनी केली. शेतक-यांना आपली प्रगती साधायची असेल तर त्यांनी पीक पद्धतीत बदल करायला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. याखेरीज शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी आपल्यासह काही मंत्र्यांची नेमणूक केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.