पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात

Updated: May 21, 2018, 11:20 AM IST
पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात  title=

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात MMRDA च्या विविध प्रकल्प उद्घाटन आणि प्रकल्प भूमिपूजनां च्या कार्यक्रमांसाठी येत आहेत. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्याचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष असेल. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याना रुचलेला नाहीये. या निवडणुकीमुळे सध्या शिवसेना-भाजपमध्ये तणाव खूप वाढलाय. या पार्श्वभूमीवर शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत ठाण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार की टाळणार याकडे सर्वाचं लक्ष असेल.