...या बछड्याची आई कुठे हरवलीय?

भंडारा जिल्ह्यातल्या कोका वनपरिक्षेत्रात सध्या एक शोध सुरू आहे.... हा शोध आहे एका आईचा... 

Shubhangi Palve Updated: Apr 10, 2018, 07:21 PM IST

माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा जिल्ह्यातल्या कोका वनपरिक्षेत्रात सध्या एक शोध सुरू आहे.... हा शोध आहे एका आईचा... 

भंडाऱ्यातल्या कोका अभयारण्याला लागून असलेल्या शेतात सध्या ग्रामस्थ एका बछड्यांची काळजी घेत आहेत. गेल्या सहा - सात दिवसांपासून बिबट्याचे दोन बछडे इथे मस्ती करताना दिसत आहेत. पण, त्यांच्यासोबत त्यांची आई मात्र नाही. या बछड्यांच्या आईला शोधण्यासाठी वनविभाग कसून प्रयत्न करतंय... त्यासाठी वॉचटॉवर उभारण्यात आलाय. 

आगीपासून थोडक्यात वाचले... 

कोका अभ्यारण्याला लागून असलेल्या उसाच्या शेतात २३ मार्चला ही बिबट्यांची पिल्लं सापडली. बिबट्यांना धोका पोहोचू नये, म्हणून बरेच दिवस उसाची कापणीही करण्यात आली नाही. उसाच्या शेताला एका शेतकऱ्यानं आग लावल्यानंतर त्या आगीतूनही या बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. हे बछडे आईपासून दुरावलेले असल्यानं त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जातेय.... त्यांना शेळीचं दूध पाजलं जातंय... त्यांच्या आईच्या शोधासाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेत.
 
येत्या पाच ते सहा दिवसात या बछड्यांची आई आली नाही, तर त्यांना जुन्नरमधल्या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.