मेट्रोचं काम संथ गतीनं सुरु असल्याने वाहतूक कोंडी, भिवंडीकरांचा आरोप

 वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

Updated: Jan 31, 2021, 06:41 PM IST
मेट्रोचं काम संथ गतीनं सुरु असल्याने वाहतूक कोंडी, भिवंडीकरांचा आरोप title=

भिवंडी : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प 5 चं पहिल्या टप्प्यातलं काम सुरु झालंय. बाळकूम ते भिवंडी धामणकर नाका दरम्यान संथ गतीनं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होतेय. ठाणे भिवंडी रस्त्यावर कशेळी, काल्हेर, पूर्णा, राहनाळ, अंजुरफाटा इथे भरपूर गोदामं आहेत. त्यामुळे सतत अवजड वाहनांची येजा असते. अरुंद रस्ता आणि मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेटिंगमुळे भिवंडी-ठाणे या अर्धा तासाच्या प्रवासाला दीड ते दोन तास प्रवास करावा लागतोय .  

या वाहतूक कोंडीच्या समस्येचा अजून किमान चार वर्षे सामना भिवंडीकर नागरीकांना करावा लागणार असल्याने नागरीक त्रस्त असून हे काम सुनिश्चित वेळेत पूर्ण व्हावे अशी त्यांची मागणी आहे. भिवंडी शहरातील मार्ग लवकर स्पष्ट व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .स्थानिकांनी किती दिवस वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत राहावा असा प्रश्न स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भगत यांनी उपस्थित केला आहे.