जीन्स घातली म्हणून 5 शिक्षकांना मिळाली नोटीस

पाच शिक्षकांनी जीन्स पॅन्ट घातल्या म्हणून त्यांना थेट नोटीस देण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी या नोटीसा बजावल्या आहेत.

Updated: Jan 31, 2021, 06:10 PM IST
जीन्स घातली म्हणून 5 शिक्षकांना मिळाली नोटीस title=

पालघर: आतापर्यंत विद्यार्थ्यांनी कपडे नीट घातले नाहीत किंवा काही ठिकाणी महाविद्यालयात चालणार नाहीत असे कपडे घातले म्हणून वाद निर्माण झालेला पाहिला असेल. त्यांना शिक्षा म्हणून कारवाई केल्याचं पाहिलं असेल. पालघरमध्ये एका महाविद्यालयात शिक्षकांनाच नोटीस बजावण्यात आली आहे.

पाच शिक्षकांनी जीन्स पॅन्ट घातल्या म्हणून त्यांना थेट नोटीस देण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी या नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांनी राष्ट्रीय पोषाख घातला नाही. 

शिक्षकांचे गणवेश कसे असावेत याबाबत नियम असतानाही या शिक्षकांनी त्याला कचऱ्याची टोपली दाखवली. शाळेत हे नियम प्रजासत्ताक दिनादिवशी पाळले न गेल्यानं 5 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. या शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे.

 शासनानं जारी केलेल्या नियमानुसार शिक्षकांना शाळेत जीन्स घालण्यास मनाई आहे. कार्यालयीन वेळेत नियमानुसार पोषख नसल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

शासकीय कार्यक्रमात जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट न घालता राष्ट्रीय पोशाख परिधान करावा असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं होतं. तरीही शिक्षकांनी जीन्स पँट घातल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे.

बऱ्याचवेळा विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाला नीट कपड्यांमध्ये नसतील तर त्यांना शिक्षा केली जाते. इतकच नाही तर अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असते. मात्र पालघरमध्ये जीन्स घालून येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नोटीस देण्यात आली आहे. 

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात जीन्स पँट घातली म्हणून जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांना नोटीस देण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड गटविकास अधिका-य़ांनी कारवाई केली आहे. या घटनेमुळे शिस्त आणि नियम तोडणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थ्यांना यातून नक्कीच धडा मिळाला असणार आहे. नियमबाह्य जाणाऱ्यावर कारवाई होते या धाकातून कुणी नियम मोडण्याचं धाडस करणार नाही.