एकतर्फी प्रेमाचा फास! तरुणाच्या त्रासाला वैतागून तरुणीने उचललं भयंकर पाऊल...

Suicide News in Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने आत्महत्या केली आहे. बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात ती शिकत होती

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 1, 2024, 09:46 AM IST
एकतर्फी प्रेमाचा फास! तरुणाच्या त्रासाला वैतागून तरुणीने उचललं भयंकर पाऊल...  title=
BHMS student ends life over harassment in one-sided love

Suicide News in Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यानंतर दोन तासांत आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे. मृत गायत्रीच्या मावशीने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गायत्रीने दत्तू त्रास देत असल्याचे तिच्या मावशीला सांगितले होते. त्यावेळी तिच्या मावशीनेही त्याला समजावले होते. मात्र तरीही तो ऐकत नव्हता. 

गायत्री आणि दत्तू दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. गावी असताना त्यांची ओळख झाली होती. मात्र शहरात आल्यापासून त्यांचे भेटणे कमी झाले होते. तेव्हापासून तो तिला सतत कॉलकरुन बोलवत होता. कॉल उचलला नाही की मेसेज करायचा. ब्लॉक करुनही तो वारंवार दुसऱ्या क्रमांकावरुन कॉल करायचा. या सर्व त्रासाला वैतागून गायत्रीने आत्महत्या केली आहे. 

कराड येथेही एक धक्कादायक घटना घडली आहे. कराडच्या मलकापूर येथे प्रेम प्रकरणातून एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला प्रियकराने इमारतीवरुन ढकलले आहे. आरुषी सिंह असं या मुलीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. धृव छिक्कार असं प्रियकराचे नाव असून कराड पोलिसांनी या प्रकरणी त्याच्यावर खूनाचा गु्न्हा दाखल केला आहे.