आताची सर्वात मोठी बातमी, भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान'

Bhonge vs Hanuman Chalisa : मशिदीसमोर भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान' ( MNS's 'R plan') तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Updated: Apr 27, 2022, 07:46 AM IST
आताची सर्वात मोठी बातमी, भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान' title=

मुंबई : Bhonge vs Hanuman Chalisa : मशिदीसमोर भोंगे वाजवण्यावरुन मनसेचा 'आर प्लान' ( MNS's 'R plan') तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून भोंगे खरेदी सुरू झाली असून, औरंगाबादसाठी पुण्यातून बॅटरीवर चालणाऱ्या 50 भोंग्यांची खरेदी झाली आहे. पहिल्या टप्प्यात मशिदीसमोरच्या मंदिरांवरच भोंगे वाजवण्याचा प्लान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवण्यासाठी मनसेनं हा प्लान तयार केला आहे. तसा मनसेनं 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्याअनुशंगाने मनसेनं 'आर प्लान' तयार केला असून, पदाधिकाऱ्यांकडून जोरदार भोंगा खरेदी सुरु केली आहे. 

मनसेचा 'आर प्लान' काय आहे?

मनसेच्या 2 एप्रिलच्या मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील, त्याच्यासमोर दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले होते. मनसेचा प्लॅन 'आर प्लान' मध्ये पदाधिकाऱ्यांकडून भोंगे खरेदी, पहिल्या टप्प्यात मशिदीसमोरच्या मंदिरांवरच वाजवणार; औरंगाबादसाठी पुण्याहून 50 भोंग्यांची खरेदी, राज्यातही हीच योजना

मशिदींसमोरील मंदिरांची यादी तयार करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. दरम्यान, सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे. पदाधिकारी स्वखर्चातून त्यांना शक्य तेवढे भोंगे खरेदी करत आहेत. शासनाने 3 तारखेपर्यंत ठोस भूमिका नाही घेतली तर पहिल्या टप्प्यात मशिदींसमोरच्या मंदिरांवरच भोंगे लावले जातील. शहरात मशिदींजवळील मंदिरांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. पुढच्या टप्प्यात मशिदीसमोर मंदिर नसणाऱ्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे लावले जातील.

बॅटरी, पेनड्राइव्हवर चालतात भोंगे

औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी 1500 ते 1800 रुपये दराने पुण्यातून 50-55 भोंग्यांची खरेदी केली आहे. आता भोंग्यांसाठी वीज, सीडी प्लेअर आदी लागत नाही. बॅटरीवरील भोंग्यांतच अॅम्प्लिफायर आहे. ते पेनड्राइव्ह वा ब्ल्यूटूथनेही कनेक्ट होतात. वजनाने हलके असल्याने सहज उचलून गच्चीवर ठेवता येतात. स्पीकरवरही हनुमान चालिसा वाजवण्याचे नियोजन आहे.